थोडक्यात
मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा मोठे आंदोलन
ग्रॅच्युइटी आणि भत्ता मिळत नसल्याने आंदोलन
शशांक रावांनी 10 तारखेपासून बेस्टचा संप पुकारलाय
(BEST Employees Strike) मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपासून मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप असणार असून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी आणि भत्ता मिळत नसल्याने शशांक राव यांनी 10 तारखेपासून बेसचा संप पुकारलाय.
बेस्ट वर्कर्स युनियन आणि संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने मिळून हे आंदोलन पुकारले असून या आंदोलनात कंत्राटी चालकांचा विशेष सहभाग असेल. युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले की, कंत्राटी चालक पूर्णवेळ बेस्ट चालकांसारखेच काम करतात.
त्यामुळे त्यांनाही पूर्णवेळ पगार आणि इतर सुविधा मिळायला हव्यात." याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात येणार आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी आणि भत्ता मिळत नसल्यानं हा संपाचा निर्णय घेण्यात आला आहे.