थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kurla ) कुर्ल्यात भाजप कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. आकाश सिंग, आदित्य पानसे, असीम सिंग यांच्यावर फेरीवाल्यांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची माहिती मिळत असून या हल्ल्यात आकाश सिंग यांच्या डोक्यावर थेट वार करण्यात आला असून धारदार शस्त्रांनीही हल्ला झाला आहे.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आदित्य पानसे व असीम सिंग यांनाही मारहाण करण्यात आली आहे. दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत असून या घटनेनंतर संतप्त सकल हिंदू समाजाने कुर्ला पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.
Summary
कुर्ल्यात भाजप कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला
आकाश सिंग,आदित्य पानसे, असीम सिंग यांच्यावर फेरीवाल्यांचा हल्ला
धंद्यासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून मारहाण