थोडक्यात
कबुतरांना खाद्यपदार्थ टाकण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असे सांगण्यात आले
वांद्रेमध्ये 4 कबुतरप्रेमींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
(Bandra) कबुतरांना खाद्यपदार्थ टाकण्यास न्यायालयाने बंदी घातली असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असे सांगण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता वांद्रेमध्ये 4 कबुतरप्रेमींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कबुतरांना खाद्यपदार्थ टाकण्यास न्यायालयाने बंदी घातली असताना देखील खाद्यपदार्थ टाकण्यात आले असून वांद्रे येथील तलावाजवळ चार जण कबुतरांना खाद्य टाकताना आढळले.
याप्रकरणी आता पालिका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यात या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.