थोडक्यात
मध्य रेल्वेवर कर्जत ते खोपोली दरम्यान ब्लॉक
कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पॉवर ब्लॉक
24ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक
(Central Railway) मध्य रेल्वेवर आजपासून 9 दिवसांचा 'पॉवर ब्लॉक' घेण्यात येणार आहे. कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी 'पोस्ट नॉन-इंटरलॉकिंग' कामासाठी हा 'पॉवर ब्लॉक' घेण्यात येणार असून 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.
ब्लॉकमुळे या मार्गावरील काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.ब्लॉकच्या कालावधीत कर्जत - खोपोली दरम्यान कोणतीही उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध असणार नाही.
याच पार्श्वभूमीवर प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासावे आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 24ऑक्टोबर व 27 ते 31 ऑक्टोबरदरम्यान दररोज सकाळी 11.20 ते दुपारी 1.20 वाजेपर्यंत तर 25 व 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.20 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे.