Mumbai : मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गँगस्टर प्रसाद पुजारीसह 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हाणामारीला सुरुवात कशी झाली आणि कोणी केली याची अद्याप माहिती मिळाली नाही आहे.
वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला असल्याची माहिती मिळत असून हाणामारी प्रकरणी जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.