थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Cold Wave) गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी वाढल्याचे जाणवत आहे. दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरातही वातावरणात चांगलाच गारठा जाणवत आहे.उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे डिसेंबरपासून मुंबईत किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळत असून किमान तापमानात 0.2 अंशांनी घट झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस गारठा कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील किमान तापमान 16 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान कायम असल्याची माहिती मिळत आहे.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी 19.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची तर सांताक्रूझ केंद्रात 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
Summary
मुंबईत गारठा कायम
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील थंडीत वाढ
16 ते 19 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद