देशात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) यासंबंधित शिक्षण देण्याची तयारी सुरू झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ITIमध्ये AIसह 6 नव्या अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच आता काळानुसार बदललेली आणि उद्योगक्षेत्रात मागणी असलेली कौशल्ये शिकवली जाणार आहेत.
इलेक्ट्रिक वाहन अभ्यासक्रम बाजारात विजेवर चालणाऱ्या वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे या वाहनांच्या देखभालीसाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांची आवश्यकता भासत आहे. ड्रोन टेक्नोलॉजी शेती, सर्वेक्षण, सुरक्षा, चित्रिकरण अशा विविध क्षेत्रांत ड्रोनचा वापर वाढतो आहे. सोलर तंत्रज्ञान – स्वच्छ ऊर्जा म्हणून सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. थ्रीडी प्रिंटिंग आणि इंडस्ट्रियल रोबोटिक्स उद्योगांमध्ये अचूकता आणि जलद उत्पादनासाठी या तंत्रज्ञानांची गरज वाढली आहे.
या नव्या अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), विद्युत वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान आणि सोलर तंत्रज्ञ या क्षेत्रांचा समावेश आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. सध्या ITIमध्ये वेल्डर (Welder), फिटरFitter , वायरमन, Electrician मोटर मेकॅनिक Motor Works अशा पारंपरिक अभ्यासक्रमांचे वर्चस्व आहे. मात्र, उद्योग क्षेत्रात सतत बदल होत असल्यामुळे आणि नव्या तंत्रज्ञानाची गरज निर्माण झाल्यामुळे नवीन अभ्यासक्रमांचा समावेश अनिवार्य ठरत आहे.
इलेक्ट्रिक वाहन अभ्यासक्रम बाजारात विजेवर चालणाऱ्या वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे या वाहनांच्या देखभालीसाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांची आवश्यकता भासत आहे. ड्रोन टेक्नोलॉजी शेती, सर्वेक्षण, सुरक्षा, चित्रिकरण अशा विविध क्षेत्रांत ड्रोनचा वापर वाढतो आहे. सोलर तंत्रज्ञान – स्वच्छ ऊर्जा म्हणून सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. थ्रीडी प्रिंटिंग आणि इंडस्ट्रियल रोबोटिक्स – उद्योगांमध्ये अचूकता आणि जलद उत्पादनासाठी या तंत्रज्ञानांची गरज वाढली आहे.
या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना फक्त आधुनिक ज्ञान मिळणार नाही, तर त्यांना नोकरीच्या संधीही लवकर प्राप्त होऊ शकतील. बदलत्या युगात तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.