थोडक्यात
मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं नागरिकांना आवाहन
एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम 60 दिवस चालणार
(Elphinstone Bridge) एल्फिन्स्टन पुल पाडण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध केल्याचे पाहायला मिळाले. यातच आता मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. एल्फिन्स्टन पूल पाडून त्या जागी नवीन एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.
हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम 60 दिवस चालणार असल्याची माहिती मिळत आहे. कडेकोट बंदोबस्तात पूल रात्रीपासून बंद करण्यात आला असून नवीन पुलाचं काम होण्यासाठी 16 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आले असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
पूर्वेकडून पश्चिमेकडे (East → West):
दादर ईस्ट → दादर वेस्ट : टिळक ब्रिज
परळ ईस्ट → प्रभादेवी / लोअर परळ : करीरोड रोड ब्रिज (07.00 – 15.00)
परळ / भायखळा ईस्ट → प्रभादेवी / वरळी / सी लिंक : चिंचपोकळी ब्रिज
पश्चिमेकडून पूर्वेकडे (West → East):
दादर वेस्ट → दादर ईस्ट : टिळक ब्रिज
प्रभादेवी / लोअर परळ → परळ / KEM / टाटा हॉस्पिटल : करीरोड रोड ब्रिज (15.00 – 23.00)
सी लिंक / वरळी / प्रभादेवी → परळ / भायखळा ईस्ट : चिंचपोकळी ब्रिज
करीरोड रोड ब्रिज (महादेव पालव रोड) वाहतूक वेळापत्रक
07.00 – 15.00 : भारत माता जंक्शन → शिंगटे मास्टर चौक (एकमार्गी)
15.00 – 23.00 : शिंगटे मास्टर चौक → भारत माता जंक्शन (एकमार्गी)
23.00 – 07.00 : दोन्ही बाजू खुली