विवेक फळसाळकर हे आज 30 एप्रिल रोजी निवृत्त झाले. आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपद देण्यात आलं आहे.
देवेन भारती यांनी महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशी पदं भूषवली. तसेच देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आयुक्तपदासाठी रितेश कुमार, संजयकुमार वर्मा, सदानंद दाते, अर्चना त्यागी यांची नावे चर्चेत होती.
देवेन भारती यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी कार्यरत होते.