थोडक्यात
लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका
लोकशाही मराठीच्या बातमीनंतर नालेसफाईला सुरुवात
पावसाळ्यानंतर मुंबई उपनगरात नाल्यांमध्ये जमा झाला होता कचरा
( Mumbai ) पावसाळ्यानंतर मुंबई उपनगरातील नाल्यांमध्ये पुन्हा कचरा गोळा झाला होता. नाले तुडुंब भरल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत असून यावर संताप व्यक्त केला जात होता. याच पार्श्वभूमीवर लोकशाही मराठीने नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांच्या समस्या दाखवल्या. त्यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले असून घाटकोपर मधील त्या नाल्याची पालिकेकडून सफाई सुरू करण्यात आली आहे. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर नालेसफाईला सुरुवात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.