थोडक्यात
पश्चिम द्रुतगती महामार्गावर पहाटे भीषण अपघात
पोर्शे कारचा चुराडा, तरुण चालक गंभीर जखमी
कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
(Mumbai Accident) मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोर्शे कार आणि बीएमडब्ल्यू कारची शर्यत सुरु होती.
यावेळी पोर्शे कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळून पोर्शे कार चार-पाच वेळा पलटी झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पोर्शे कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे.
पोर्शे कारच्या जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचा चुराडा झाला असून मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.