थोडक्यात
हार्बर रेल्वे मार्गावर साडेचौदा तासांचा ब्लॉक
वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा बंद
नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
(Harbour Line Mega Block) हार्बर रेल्वे मार्गावर साडेचौदा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक आज रात्रीपासून रविवार दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक असणार आहे.
या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड – मानखुर्ददरम्यानची लोकल सेवा बंद राहणार असून लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला – टिळक नगर स्थानकांदरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.