Ganpati visarjan 2025 
मुंबई

Ganpati visarjan 2025 : Rain Update : मुंबईत आज सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

मुंबईत आज सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी

गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज

गणपती विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार

(Ganpati Visarjan 2025) दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.

गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. यातच मुंबईत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून गणपती विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार आहे. दक्षिण मुंबईत रिमझिम पावसाची शक्यता असून उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र गणेशभक्तांचा उत्साह कुठेही कमी होताना पाहायला मिळणार नाही आहे. कारण गणपती बाप्पाची मिरवणूक पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या गणेश भक्तांचा एक वेगळाच आनंद असतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा