थोडक्यात
पुढील 15 दिवस वातावरणात बदल होणार
ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण
गेले काही दिवस मुंबईत साथीच्या आजारात वाढ
(Weather Update) राज्यात पावसाने विश्रांती घेतली असतानाच आता उकाड्याचा जोर वाढला आहे. तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता असून तापलेल्या वातावरणामुळे मुंबईकरांच्या अंगाची काहिली झालेली आहे.
आता पुढील 15 दिवस वातावरणात चढ उतार राहणार असल्याचा अंदाज आहे. दिवसा ऊन आणि रात्री गारवा जाणवणार असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे असेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या वातावरण बदलाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गर्दीच्या ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात आल्याने साथीचे आजार वाढल्याची शक्यता असून हवामान आणि साथीच्या आजाराने सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.