Mumbai High Tide Alert 
मुंबई

Mumbai High Tide Alert : मुंबईच्या समुद्रात उंच लाटा उसळणार; 'या' कालावधीत सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार

मुंबईच्या समुद्रात उंच लाट उसळणार अूसन समुद्राला मोठी भरती येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Mumbai High Tide Alert) मुंबईच्या समुद्रात उंच लाट उसळणार अूसन समुद्राला मोठी भरती येणार आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. 24 जुलैपासून सलग चार दिवस मोठी भरती येणार आहे.

24 ते 27 जुलै 2025 या कालावधीत सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याची माहिती मिळत आहे. भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. 26 जुलै रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे 4.67 मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहेत.

यामध्ये 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजून 57 मिनीटांनी लाटांची उंची 4.57 मीटर असणार आहे. 25 जुलै 2025 रोजी लाटांची उंची ही 4.66 मीटर असणार आहे. 26 जुलै 2025 रोजी लाटांची उंची 4.67 मीटर असणार असून 27 जुलै 2025 रोजी 1.56 वाजता लाटांची उंची 4.60 मीटर असणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Veda Krishnamurthy : भारताची महिला क्रिकेटर वेदा कृष्णामूर्तीची क्रिकेटमधून निवृत्ती

Donald Trump : गाझा करार कोसळला! हमासवर भडकले डोनाल्ड ट्रम्प; म्हणाले, इस्रायलला पूर्ण मोकळीक

Pune : पुणे विमानतळावर 10.5 कोटींच्या 'हायड्रोपोनिक वीड' सह प्रवासी अटकेत

Latest Marathi News Update live : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट