(Kabutar Khana ) मुंबईतील कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरून जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात आज 13 ऑगस्टपासून जैन समाज उपोषणाला बसणार असल्याची माहिती मिळत आहे.
देशभरातील हजारो जैन बांधव या उपोषणात सहभागी होणार आहेत. वेळ पडल्यास शांतताप्रिय, अहिंसावादी जैन समाज धर्मासाठी शस्त्रही हाती घेईल आणि न्यायालयाच्या आदेशालाही जुमानणार नाही, असा इशारा या आंदोलनाची घोषणा करताना जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर दादरमध्ये मराठी एकीकरण समितीने आज बुधवारी 13 ऑगस्टला कबुतरखाना बंदीच्या समर्थनात आंदोलन पुकारले आहे. यावरुन दादरमध्ये पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता आहे. देशभरातून हजारो जैन बांधव उपोषणात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.