थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Arnav Khaire) अर्णव खैरे 18 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला. गर्दीच्या डब्यात अर्णवने इतरांना बाजूला होण्यासाठी सहज हिंदीत “थोडा आगे हो…” असे म्हटले. यावरुन काही अनोळखी प्रवाशांनी त्याला घेरले. “मराठी बोलता येत नाही का?”, “मराठी बोलण्याची लाज वाटते का?” असे प्रश्न त्याला विचारले आणि त्याला बेदम मारहाण केली.
हिंदीत बोलल्याचा राग काढत टोळक्याने मारहाण केल्याच्या मानसिक धक्क्यातून त्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्णव खैरे आत्महत्येनंतर वातावरण तापलं असल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज अशा प्रवृत्तींना सदबुध्दि द्या अशा प्रकारची प्रार्थना शिवाजी पार्कवरील हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाव अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्ते करणार आहेत.
Summery
अर्णव खैरे मारहाण आणि आत्महत्या प्रकरण
अर्णव खैरे आत्महत्येनंतर वातावरण तापलं
भाजपची आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी सद्बुद्धी द्या प्रार्थना