Kalyan Crime 
मुंबई

Kalyan Crime : कल्याणमध्ये तरुणीला मारहाण प्रकरण; आरोपी गोकूळ झाला अटक

कल्याण शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाने अमानुष मारहाण केली.

Published by : Team Lokshahi

(Kalyan Crime) कल्याण शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीवर एका परप्रांतीय तरुणाने केलेल्या अमानुष मारहाणीने शहरात खळबळ माजवली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल झा याला अखेर पोलिसांनी अटक केली असून, मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं. या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून पक्षाच्या नेत्यांनी थेट पीडित तरुणीची भेट घेतली व तिला न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल झा हा पूर्वीही गुन्हेगारी प्रकरणांत अडकलेला असून, यावेळी त्याच्यासोबत आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचा भाऊ रणजीत झाला देखील या प्रकरणात अटक केली आहे. या हल्ल्यानंतर नागरिकांनी पोलिसांकडे आरोपीला तातडीने अटक करण्याची जोरदार मागणी केली होती.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की, संबंधित तरुणी रुग्णांची नोंदणी करत असताना आरोपीने तिला शिवीगाळ केली आणि नंतर तिच्यावर लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे हल्ला केला. तिला ओढून क्लिनिकबाहेर फरफटत नेलं गेलं. या प्रकरणामुळे स्थानिक जनतेमध्ये प्रचंड असंतोष असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ एक पोलीस अंमलदार'

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार