थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Gas Leak In Vasai ) वसईच्या दिवाणमान परिसरात क्लोरीन वायू गळतीमुळे मोठी दुर्घटना झाली आहे. नगरपरिषद काळापासून जलकुंभावर ठेवलेला १०० किलो क्षमतेचा क्लोरीन सिलेंडर दुरुस्तीच्या कामादरम्यान खाली पडला.
सिलेंडरचा आउटफ्लो व्हॉल्व तुटल्याने क्लोरीन गॅसचा विसर्ग सुरु झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींवर वैद्यकीय देखरेख सुरू असून महानगरपालिकेचा आरोग्य विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
वसई दिवाणमान येथे क्लोरीन गॅस गळतीची दुर्घटना
दुर्घटनेत 1 नागरिकाचा मृत्यू, 17 जण जखमी
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु