बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Western Railway) पश्चिम रेल्वे ब्लॉक कालावधीत कांदिवली आणि बोरीवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित महत्त्वाची कामे केली जात आहेत.
या कामांसाठी 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. 21 डिसेंबरपासून मेगाब्लॉक घेण्यात आला असून सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांचे यामुळे हाल झाले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 100 लोकल रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
18 जानेवारी 2026 पर्यंत ब्लॉक राहणार असून हा ब्लॉकचा कालावधी वाढवला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बोरीवली-विरार सारख्या गर्दीच्या स्थानकांवर हेल्प डेस्क सुरु करण्यात आले आहेत.
Summary
100 लोकल रद्द झाल्याने पश्चिम रेल्वेमार्गावर प्रवाशांची मोठी गैरसोय
कांदिवली बोरिवली भागात सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक
21 डिसेंबरपासून 30 दिवसांचा मेगाब्लॉक