(Jogeshwari Building fire) जोगेश्वरी परिसरातील जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत इमारतीचे 4 मजले आगीच्या विळख्यात सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. घटनेत जवळपास 7 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
या इमारतीत काही जण अडकल्याची माहिती मिळत आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाकडून इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
जोगेश्वरी बिझनेस सेंटरला लागलेल्या आगीत 4 मजले आगीच्या भक्ष्यस्थानी गेले असून आतापर्यंत 24 लोकांना रेस्क्यू करण्यात अग्निशमन दलाला यश आल्याचीम माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. अद्यापही 11 आणि 12 मजल्यावर धूर पाहायला मिळत आहे.