थोडक्यात
मुंबईतील कफ परेड परिसरात भीषण आग
पहाटेच्या सुमारास एका चाळीत ही आग लागली
एका मुलाचा मृत्यू, 3 जण जखमी
( Mumbai ) मुंबईतील कफ परेड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका मुलाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील कफ परेड येथील मच्छिमार नगर परिसरात पहाटेच्या सुमारास एका चाळीत ही आग लागली असून मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आग विझवली, पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमींना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.