Mega Block 
मुंबई

Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

( Mega Block ) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि भाईंदर दरम्यान शनिवारी मध्यरात्री 12:30 ते रविवारी पहाटे ४ पर्यंत मेगा ब्लॉक आहे. यावेळी धिम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील.

मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10:40 ते दुपारी 03:40 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 9:34 ते दुपारी 3:03 पर्यंत सुटणाऱ्या लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

यासोबतच सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत हार्बर मार्गावर वडाळा रोड मानखुर्ददरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल-मानखुर्द-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवल्या जाणार असून सकाळी 10 ते संध्याकाळी 4:30 पर्यंत ट्रान्स हार्बर लाइनवर प्रवाशांना प्रवास करण्यासाठी परवानगी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?