(Mumbai Rain Update ) गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईसह कोकण विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातच सकाळपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही आज पहाटेपासूनच पावसाचा जोर दिसून येत आहे.
पावसाची संततधार सुरु असून रेल्वेवर देखील याचा परिणाम दिसून येत असून मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरू आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.