(Mumbai Best Bus Accident ) मुंबईच्या गोरेगावमध्ये ट्रक आणि बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पहाटे सहा वाजता हा ट्रक आणि बेस्ट बसचा मोठा अपघात झाला.
गोरेगाव परिसरात वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला बेस्ट बसणे मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात बसचे मोठे नुकसान झालं आहे.
जखमी प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून वनराई पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.