(Mumbai Coronavirus ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
यातच आता मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये संशयित कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे मात्र हे मृत्यू कोरोनामुळे झाले नसून त्यांना असलेल्या वेगळ्या आजारांमुळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
केईएम रुग्णालयात रविवारी सकाळी 58 वर्षीय एका महिलेचा तर 13 वर्षीय मुलीचा संशयित कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये 58 वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.