थोडक्यात
ई-वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबरपासून कार्यान्वित
गेट वे ऑफ इंडिया ते JNPA प्रवास होणार 40 मिनिटांत
दोन ई-वॉटर टॅक्सी प्रवासासाठी सज्ज
(E water taxi service) मुंबईत ई-वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीएपर्यंत ही टॅक्सी चालणार आहे. या बोटींची प्रवासी क्षमता 20 प्रवासी अशी असून गेटवे ते जेएनपीए प्रवासासाठी 100 रुपये असे तिकिट दर असण्याची माहिती मिळत आहे.
या टॅक्सीमुळे गेट वे ऑफ इंडिया ते JNPA प्रवास फक्त 40 मिनिटांत होणार आहे. दोन ई-वॉटर टॅक्सी प्रवासासाठी सज्ज असणार असून यामध्ये एक ट्रक्सी सौर ऊर्जेवर तर दुसरी पूर्णत विद्युत टॅक्सी असणार आहे. या टॅक्सीच्या देखभालीची जबाबदारी भारत फ्रेट ग्रुपकडे सोपवली असल्याची माहिती मिळत आहे.