(Mumbai Electricity ) मुंबईकरांना विजेसाठी आता चौथा पर्याय उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे. बेस्ट, अदानी, टाटाच्या स्पर्धेत महावितरण देखील उतरणार आहे. मुंबईत वीजपुरवठा करण्यासाठीच्या परवान्याकरिता महावितरणने वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.
मुंबईकरांना विजेसाठी आता बेस्ट, अदानी व टाटासोबत महावितरणचा पर्याय उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी, हरकतीनंतर आयोगाकडून निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरात वांद्रे ते दहिसर, पूर्व उपनगरात विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखुर्द तसेच चेना व काजुपाडासह मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात वीज वितरणासाठी परवाना मिळावा, अशी मागणी महावितरणने आयोगाकडे केली आहे.