Mumbai Goregaon Film City Anupamaa Set Fire 
मुंबई

Mumbai Goregaon Film City Anupamaa Set Fire : गोरेगाव फिल्मसिटीतील अनुपमा मालिकेच्या सेटला भीषण आग

मुंबईमधील गोरेगाव पूर्वेतील असलेल्या फिल्मसिटीमध्ये अनुपमा या मालिकेच्या सेटला भीषण आग लागली.

Published by : Team Lokshahi

(Mumbai Goregaon Film City Anupamaa Set Fire )मुंबईमधील गोरेगाव पूर्वेतील असलेल्या फिल्मसिटीमध्ये अनुपमा या मालिकेच्या सेटला भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण मालिकेचा सेट जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे काही काळ फिल्मसिटी परिसरात तणावाचे वातावरण होते. या आगीमुळे आजूबाजूच्या सेटवरील चित्रीकरणही बंद करण्यात आले आहे.

पहाटे पाचच्या सुमारास अनुपमा मालिकेच्या सेटला आग लागली. आगीचे वृत्त कळताच तात्काळ अग्निशामक दलाच्या जवानांना त्याठिकाणी बोलावण्यात आले. या भीषण आगीत अनुपमा मालिकेचा संपूर्ण सेट जळून खाक झाल्यामुळे निर्मात्याचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या वेळेला या सेटवर आग लागली त्या वेळेला सकाळच्या सीनच्या चित्रिकरणासाठी आवश्यक तयारी चालू होती. त्यावेळेला तेथे अनेक क्रू मेंबर आणि काम करणारे कामगार उपस्थित होते.

मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी या घटनेची तपासणी करण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले असून फिल्म सिटीच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ही आग शॉटसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत आरे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर