(Mumbai High Tide ) आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आजही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या महाराष्ट्रासह चार राज्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
आज काही ठिकाणी हलका ते काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असू दुपारी 1.03 वाजता समुद्राला 4.88 मीटर उंच लाटांची मोठी भरती येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.