Mumbai Local Mega Block  
मुंबई

Mumbai Local Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा...!

मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Mumbai Local Mega Block ) मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर दिवसाचा ब्लॉक घेतला जाणार नाही. माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी, मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहे. तसेच ठाणे येथून 11.7 ते 15.51 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान, अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

मानखुर्द आणि नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.15 ते 16.15 पर्यंत तसेच, ब्लॉकच्या वेळेत सीएसएमटी मुंबई – मानखुर्द आणि पनवेल – नेरुळ/ठाणे दरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते दुपारी 4.30 पर्यंत ट्रान्स-हार्बर लाईन / मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी येथून सकाळी 10.37 ते दुपारी 15.45 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope |'या' राशीच्या व्यक्तींना अचानक होऊ शकतो धनलाभ, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Shrimant Yuvraj Sambhajiraje Bhosale : 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे'च्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांची निवड

Chhatrapati Sambhajinagar : 35 वर्षांनंतर धक्का! PSI गफ्फार खान यांचे जात प्रमाणपत्र रद्द; पुढील वर्षी निवृत्तीपूर्वीच मोठा निर्णय