Ganpati Visarjan 2025 
मुंबई

Ganpati Visarjan 2025 : बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

70 नैसर्गिक ठिकाणे आणि सुमारे 290 कृत्रिम तलाव

जवळपास 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात

(Ganpati Visarjan 2025) अनंतचतुर्थी दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. महापालिकेकडून विसर्जन व्यवस्थेसाठी जवळपास 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात 70 नैसर्गिक ठिकाणे आणि सुमारे 290 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी 197 तात्पुरती शौचालये देखील उभारण्यात आली आहेत.

यासोबतच अग्निशमन दलाची सुसज्ज वाहने देखील तैनात करण्यात येणार असून 6,188 फ्लडलाईट आणि शोधकार्यासाठी 138 सर्चलाईट लावण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी 245 नियंत्रण कक्ष देखील कार्यरत असतील. विसर्जन स्थळांवर येणाऱ्या भाविकांसाठी 236 प्रथमोपचार केंद्रे आणि 115 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

42 क्रेन मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी असून छोट्या मूर्तींच्या विसर्जनासाठी 56 मोटरबोटी असणार आहेत. यासोबतच 594 निर्माल्य कलश असणार असून 287 स्वागत कक्ष उभारण्यात आलेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhairyasheel Rajsinh Mohite-Patil On Ajit Pawar : IPS अधिकारी प्रकरणात नवा ट्वीस्ट! "...तर बड्या नेत्याचा अजित पवारांना कॉन्फरन्स कॉल"; धैर्यशील मोहिते यांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut On Thackeray Bandhu Yuti : 'ठाकरे बंधूंमध्ये सुसंवाद, दसरा मेळाव्यानिमित्त युती पण...'

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : अखेर राजा तराफ्यावर विराजमान! तब्बल 8 तासांच्या प्रयत्नांनंतर यश; सुधीर साळवी म्हणाले की, "त्यामुळे मंडळाने निर्णय घेतला की..."

Latest Marathi News Update live : लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात