Ganpati Visarjan 2025  
मुंबई

Ganpati Visarjan 2025 : बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज; 290 कृत्रिम तलाव

दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

70 नैसर्गिक ठिकाणे आणि सुमारे 290 कृत्रिम तलाव

जवळपास 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात

(Ganpati Visarjan 2025) दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.

अनंतचतुर्थी दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. महापालिकेकडून विसर्जन व्यवस्थेसाठी जवळपास 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात 70 नैसर्गिक ठिकाणे आणि सुमारे 290 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी 197 तात्पुरती शौचालये देखील उभारण्यात आली आहेत.

यासोबतच अग्निशमन दलाची सुसज्ज वाहने देखील तैनात करण्यात येणार असून 6,188 फ्लडलाईट आणि शोधकार्यासाठी 138 सर्चलाईट लावण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी 245 नियंत्रण कक्ष देखील कार्यरत असतील. विसर्जन स्थळांवर येणाऱ्या भाविकांसाठी 236 प्रथमोपचार केंद्रे आणि 115 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

42 क्रेन मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी असून छोट्या मूर्तींच्या विसर्जनासाठी 56 मोटरबोटी असणार आहेत. यासोबतच 594 निर्माल्य कलश असणार असून 287 स्वागत कक्ष उभारण्यात आलेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा