Mumbai Rain Update 
मुंबई

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा; रेड अलर्ट जारी, वाहतुकीवर मोठा परिणाम

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे.

Published by : Team Lokshahi

(Mumbai Rain Update) मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसानंतर मंगळवारीही सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रशासनाने खबरदारी म्हणून नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. पावसामुळे शहरातील सायन, भायखळा, दादर, अंधेरी, विलेपार्ले यांसारख्या सखल भागांत पाणी साचले आहे. सततच्या पावसाचा फटका लोकल ट्रेन सेवेलाही बसला आहे. मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने, हार्बर मार्गावरील गाड्या 15 मिनिटे उशिराने, तर पश्चिम रेल्वेवरील गाड्या सुमारे 10 मिनिटे उशिराने धावत आहेत.

सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून अनेक कार्यालयांना वर्क फ्रॉम होमची सूचना देण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

BEST credit society polls Result : बेस्टच्या निवडणुकीत प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांचे पॅनल आघाडीवर

Latest Marathi News Update live : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम

Maharashtra : राज्यात 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक; 25 हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार

Maharashtra Heavy Rain : मोठी बातमी ! राज्यात पावसाचा कहर; 12 जणांचा मृत्यू