(Rain Update ) राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला असून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस पडत असून पुढील 2 ते 3 तास आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला असून मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. दक्षिण मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद झाली असल्याची माहिती मिळत आहे.