थोडक्यात
आजपासून मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार
मुंबईकरांचा आरे JVLR ते कफ परेड पर्यंतचा प्रवास आता वेगवान होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याला हिरवा झेंडा दाखवणार
(Mumbai Metro 3 ) आजपासून मुंबई मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबईकरांचा आरे JVLR ते कफ परेड पर्यंतचा प्रवास आता वेगवान होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार असून याच कार्यक्रमातून ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अंडरग्राऊंड मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर कफ परेड आणि वरळी सायन्स म्युझियम स्थानकातून एकाच वेळी दोन स्वतंत्र मेट्रो धावणार आहेत.