थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Dahisar) 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
यातच मतदान चोरी होऊ न देण्यासाठी ठाकरे बंधूंकडून नवा प्रयोग करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही पक्षांकडून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांबाहेर ‘भगवा गार्ड’ तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर दहिसरमध्ये भगवा गार्डला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पाहायला मिळत असून आयसी कॉलनी ठिकाणी भगवा गार्डला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ठाकरेंच्या शिवेसनेकडून भगवा गार्डची नेमणूक करण्यात आली होती.
Summary
दहिसरमध्ये भगवा गार्डला पोलिसांनी ताब्यात घेतलं
आयसी कॉलनी ठिकाणी भगवा गार्ड पोलिसांच्या ताब्यात
ठाकरेंच्या शिवेसनेकडून भगवा गार्डची नेमणूक