थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Raj Thackeray) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. यातच पक्षाच्या शाखांना भेटी देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे मनसे उमेदवारांच्या कार्यालयाला भेट देणार आहेत.
या भेटीनंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. कल्याण पश्चिम साई चौक, बेतुरकरपाडा, संतोषी माता रोड वरील मनसे उमेदवारांच्या कार्यलयाला राज ठाकरे भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
राज ठाकरेंचा आज कल्याण दौरा
मनसे उमेदवारांच्या कार्यालयाला भेट घेणार
भेटीनंतर कार्यकर्त्यांची बैठक घेणार