थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Raj Thackeray) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली.
मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यात काही जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बैठका घेण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभांचं नियोजन सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी 9:30 वाजता मुंबईत राज ठाकरेंचा मेळावा पार पडणार आहे.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आले असून ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचं पहिलं भाषण करण्यात येणार आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून कार्यकर्त्यांना काय संदेश? विरोधकांना काय उत्तर देणार? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Summery
आज सकाळी 9:30 वाजता मुंबईत राज ठाकरेंचा मेळावा
मुंबईतील रंगशारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन
ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचं पहिलं भाषण होणार