थोडक्यात
पवई परिसरात एका व्यक्तीनं तब्बल 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली
रोहित आर्य आणि पोलिसांमध्ये चकमक झाली त्यात आरोपीचा मृत्यू
(Rohit Arya ) मुंबईतील पवई परिसरात एका व्यक्तीनं तब्बल 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं होतं. रोहित आर्या असे त्या व्यक्तीचं नाव होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तातडीने कारवाई करत काही तासांतच सर्व मुलांची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. त्याने सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. पोलीस स्टुडिओच्या बाथरूममधून आत शिरले. यावेळी रोहित आर्य आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीत आरोपी जखमी झाला. आरोपीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
त्यानंतर आता रोहित आर्यचा मृतदेह सकाळी जे.जे. रुग्णालयात आणण्यात आला. आता याठिकाणी रोहित आर्य याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. यात आता आर्याचे नातेवाईक मृतदेह स्विकारणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.