(Samruddhi Mahamarg ) समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण 5 जूनला (गुरुवार) करण्यात येणार आहे. इगतपुरी ते आमणे या 76 किमीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
5 जूनलाच गुरुवारी हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून इगतपुरी ते आमणे टप्प्याचं काम एप्रिल पूर्ण झालं पण त्याचे उद्धाटन हे प्रलंबित होते. मुंबई - नागपूर प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे.
आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला झाला आहे. आता गुरुवारपासून शेवटच्या टप्प्यातील महामार्ग खुला करण्यात येणार आहे. 701 किमीच्या समृद्धी महामार्गामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईहून नागपूरला आता कमी वेळेत पोहोचता येणार असून या प्रवासासाठी आधी 16 तास लागत होते आता हा प्रवास फक्त 8 तासांत पूर्ण होणार आहे.