थोडक्यात
राज्यात आज लक्ष्मीपूजनाचा उत्साह
आज शेअर बाजार बंद
आज होणार मुहूर्त ट्रेडिंग
(Share Market ) दिवाळीला सुरूवात झाली असून आज लक्ष्मीपूजन आहे. याच पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजनामुळे शेअर बाजार बंद राहणार आहे. मात्र फक्त मुहूर्त ट्रेडिंग होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या वर्षी NSE आणि BSE नुसार हे ट्रेडिंग 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:45 वाजल्यापासून ते 2:45 वाजेपर्यंत होणार असून एकच तास हे ट्रेडिंग होणार आहे. उद्या देखील बलिप्रतिपदाची सुट्टी असणार आहे. हे मुहूर्त ट्रेडिंग दिवाळी आणि नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला होते. हे सत्र गुंतवणूकदारांसाठी शुभ मानलं जातं.
या दिवशी करण्यात येत असलेली गुंतवणूक चांगली मानली जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केलं जाईल आणि उद्या पाडव्यानिमित्त सुट्टी असेल.