थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Accident) अंबरनाथ मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे यांच्या कारने भीषण अपघात झाला. शिंदे गटाच्या उमेदवाराच्या भरधाव कारची दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भरधाव कारने लेन सोडून विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्या तीन दुचाकीस्वारांना उडवले. हा उमेदवार प्रचारासाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातात चार पेक्षा जास्त जण जखमी असून यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळाली नसून पोलीस तपास करत आहेत.
Summery
शिंदे गट उमेदवाराचा कार अपघात
4 जणांचा मृत्यू
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता