थोडक्यात
'मुंबईचा महापौर शिवसेनेचाच'
वांद्रेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी
ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न
(Shivsena Banner ) मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या कलानगर परिसरात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
या बॅनरवर 'यंदा महापौर शिवसेनेचाच'असे लिहिण्यात आले आहे. या बॅनरमुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच महापौर पदासाठी स्पर्धा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानच्या परिसरात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
यासोबतच मुंबई महापालिकेत यंदा भाजपचा महापौर होणार असे भाजपच्या काही नेत्यांकडूनही बोलले जात आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरबाजीवर राजकीय वर्तुळातून काही प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. बॅनरच्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.