थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) मुंबईत कांदिवली चारकोप परिसरात बांधकाम व्यावसायिकाच्या सहकाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारकोप परिसरातील फादर सुसाई इंग्लिश स्कूल परिसरात व्यावसायिक गाडी पार्क करत असताना अज्ञात व्यक्तींकडून हा 2 ते 3 राऊंड गोळीबार करण्यात आला.
गोळीबारात फ्रेडी डिलीमा याच्यावर गोळीबार झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी फरार असून सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळावर पोलीस दाखल होत पंचनामा देखील करण्यात आला असून सोबतच फॉरेन्सिक टीमकडून पुरावे देखील गोळा करण्यात आले.
Summery
कांदिवलीतील चारकोप पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार
हिंदुस्थान नाक्या जवळील गणेश नगर परिसरात फायरिंग
दोन राऊंड फायरिंग झाल्याची माहिती