Mumbai Pollution 
मुंबई

Mumbai Pollution : दादर चौपाटीवर पहाटेपासून धुरकट वातावरण; थंडीची चाहूल लागताच हवामानात बिघाड

मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai Pollution ) मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून वायुप्रदूषणाचे प्रमाणही झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. थंडीची चाहूल लागली असतानाच त्यासोबत मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे.

हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे. शहरावर धुरकट वातावरणाची चादर पसरली असून हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण झाली आहे. आज मुंबई सह दादरचा AQI 155 नोंदवला गेला असून सायंकाळपर्यंत तो 180 च्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईत वाढत्या धुके, धूळ आणि वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता ‘अतिशय वाईट’ पातळीवर पोहोचली असून आरोग्याच्या धोक्यामुळे नागरिक पुन्हा मास्क वापरताना पाहायला मिळत आहेत. मुंबईतील हवेची पातळी अत्यंत खालावली असल्याचे पाहायला मिळत असून या वातावरणामुळे अनेक भागातील नागरिक खोकला, सर्दीने त्रस्त झाले आहेत.

Summery

  • दादर चौपाटीवर पहाटेपासून धुरकट वातावरण; थंडीची चाहूल लागताच हवामानात बिघाड

  • दादर परिसराचा AQI 155; सायंकाळपर्यंत 180 पार जाण्याचा अंदाज

  • प्रदूषणामुळे नागरिक पुन्हा मास्ककडे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा