मुंबई

India-Pakistan War : Tata Memorial Hospital ला धमकीचा मेल; हॉस्पिटलच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील टाटा रुग्णालयाला धमकीचा मेल आला आहे.

Published by : Prachi Nate

पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' सुरु केलं. यानंतर काही वेळातचं भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही देशांच्या सीमारेशेवर जोरदार हल्ले सुरु आहेत. ज्यामुळे दोन्ही देशात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाली आहे.

अशातच भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील टाटा रुग्णालयाला धमकीचा मेल आला आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान रुग्णालयात पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

संपूर्ण रुग्णालयात सर्च ऑपरेशन राबविण्यात आलं आहे. ज्या मेलवरून ही धमकी आली आहे त्याचा आयपी ॲड्रेस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा