थोडक्यात
ऑक्टोबर हिट आणखी काही दिवस कायम राहणार
ऑक्टोबर हिटचा तडाखा
राज्यभर तापमान 35 अंशांवर
(Heat Wave) राज्यात पावासाने विश्रांती घेतली असतानाच आता उकाड्याचा जोर वाढला आहे. तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता असून तापलेल्या वातावरणामुळे शुक्रवारी मुंबईकरांच्या अंगाची काहिली झाली.
मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाडा आणि उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे. ऑक्टोबर हिट आणखी काही दिवस कायम राहणार असून राज्यात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.