थोडक्यात
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
श्रॉफ बिल्डिंगच्या दिशेनं बाप्पा मार्गस्थ होणार असून श्रॉफ बिल्डिंगची मानाची पुष्पवृष्टी करण्यात येणार
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत हजारोंच्या संख्येनं गणेशभक्त सहभागी
(Lalbaugcha Raja Visrajan 2025) 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा आज निरोप घेत आहे. दहा दिवस उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर भाविक आज लाडक्या गणरायाला निरोप देणार आहेत. अनंत चतुर्दशी निमित्त ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत विसर्जन करण्यात येत आहे.
लालबागच्या राजाचा मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. लालबागच्या राजाला मंडपातून बाहेर काढण्यात येत आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. लालबागचा राजा आता लालबाग मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे. लालबागला एकप्रदक्षिणा घातल्यानंतर श्रॉफ बिल्डिंगच्या दिशेनं बाप्पा मार्गस्थ होणार असून श्रॉफ बिल्डिंगची मानाची पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत हजारोंच्या संख्येनं गणेशभक्त सहभागी होत असतात. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात भक्तांचा जल्लोष सुरू आहे. ही शान कोणाची... लालबागच्या राजाची या गजरात लालबागच्या राजाला निरोप देण्यात येत आहे.