थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai ) त्रिभाषा धोरण समितीची उद्या मुंबईत कार्यशाळा आजोजित करण्यात आली आहे. राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्यात आली आणि राज्यभरात त्यास जोरदार विरोध झाला.
यातच आता यशवंतराव चव्हाण सेंटरला त्रिभाषा धोरण समितीची कार्यशाळा पार पडणार असून यामधून त्रिभाषा धोरण समिती सर्वांची मते जाणून घेणार आहेत. मात्र डॉ. दीपक पवार यांचा कार्यशाळेला विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्रिभाषा धोरणाला आमचा कायम विरोध आहे असे डॉ. दीपक पवार म्हणाले. राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
Summery
त्रिभाषा धोरण समितीची उद्या मुंबईत कार्यशाळा
यशवंतराव चव्हाण सेंटरला होणार कार्यशाळा
डॉ. दीपक पवार यांचा कार्यशाळेला विरोध